स्क्रीन रीडर
 
    1 2  
         

सोयाबीन

सोयाबीन उत्पादन तंत्रज्ञान

सोयाबीनच कमी उत्‍पादकतेची कारणे

सोयाबीन पिकाची उत्‍पादकता वाढीसाठी यशस्‍वी पेरणीचे अष्‍ठसुत्री

सोयाबिन पिकातील एकात्मिक पिक व्‍यवस्‍थापन

पिकांचे / जातीचे नाव अधिसुचित संस्था प्रकाशित वर्ष बियाणे दर (किलो/हेक्टर) कालवधी (दिवस) वाणांचे गुणधर्म सरासरी उत्पन्न (क्विंटल/हेक्टर)
फुले संगम म. फु. कृ. वि., राहुरी २०१९ ७५ ९६ ते ९७ जांभळया रंगाची फुले, तेलाचे प्रमाण १८.४२ टक्के, प्रथिनाचे प्रमाण ३८.१४ टक्के, चमकदार पिवळा दाणा. २३ ते २५
एम. ए. यु. एस.-६१२ व. ना. म. कृ. वि. परभणी २०१६ ७५ ९३ ते ९८ झाडाची उंची ६० ते ७२ सें.मी., जास्त सरळ उंच वाढणारे वाण, शेंगा तडकण्यास सहनशील, २ ते ३ दाणे प्रती शेंग, पिवळसर दाणा, कमी ओलाव्यास सहनशील, विविध किडी व रोगांना  प्रतिकारक. २१ ते २३
जेएस-२०-९८ ज.ने.कृ.वि.‍वि., जबलपूर २०१७ ७५ ९६ ते ९८ पांढरी फुले, शेंगा तडकण्यास सहनशील, पिवळसर दाणा, किडरोगांना प्रतिकारक  २५ ते २८
जेएस-२०-६९ ज.ने.कृ.वि.‍वि., जबलपूर २०१६ ७५ ९२ ते ९६ पांढरी फुले, शेंगा तडकण्यास सहनशील, पिवळसर दाणा, किडरोगांना प्रतिकारक २५ ते २८
एमएसीएस-१२८१ आगरकर अनुसंधान केंद्र, पुणे २०१६ ७५ ९५ ते ९८ झाडाची उंची मध्यम, फुलांचा रंग जांभळा, पिवळा चमकदार दाणा  २४
एन.आर.सी.-८६ आय. आय. एस. आर. इंदौर २०१५ ७५ ९५ ते ९७ जांभळया रंगाची फुले, तेलाचे प्रमाण १९.८० टक्के, प्रथिनाचे प्रमाण ४० ते ५० टक्के, चारकोल रॉट रोगास प्रतिकारक्षम तसेच खोडमाशी व गर्डल बिटल किडीस प्रतिकारक्षम  २१ ते २३
जे.एस.-२०-२९ ज.ने.कृ.वि.‍वि., जबलपूर २०१४ ७५ ९३ ते ९५ यलो व्हेन मोझॅईक रोगास प्रतिकारक, दुबार पीक व आंतर पिकाकरीता योग्य, बहुविध रोगास प्रतिकारकक्षम. २५ ते ३०
एम. ए. यु. एस.-१६२ व ना म कृ वि., परभणी  २०१२ ७५ १०० ते १०३ झाडाची उंची ५५ ते ६५ सें. मी., हिरवी पाने, सरळ उंच वाढणारे वाण, फिक्कट जांभळया रंगाची फुले, झाडाच्या शेंडयापर्यंत शेंगा लागतात, करडया रंगाच्या शेंगा, शेंगा तडकण्यास सहनशील, २ ते ३ दाणे प्रती शेंग, पिवळा दाणा, मशीनद्वारे कापणीस योग्य, रोग व किडींना प्रतिकारक. २० ते ३०
एमएसीएस-११८८ आगरकर अनुसंधान केंद्र, पुणे २०१३ ७५ १०० ते १०५ उंच, फुलांचा रंग पांढरा, लव नसलेल्या तपकिरी रंगाच्या शेंगा, पिवळा दाणा, बिपी, आरएबी चारकोल रॉटला अंशत: प्रतिकारक्षम. २० ते ३०
एम.ए.यु.एस.-१५८ व. ना. म. कृ. वि. परभणी २०१० ७५ ९३ ते ९८ झाडाची उंची ४० ते ६० सें.मी., चोपडी गडद हिरवी पाने, जांभळया रंगाची फुले, बदामी रंगाच्या शेंगा, शेंगा तडकण्यास सहनशील, २ ते ३ दाणे प्रती शेंग, काळसर हायलम व पिवळसर आयाताकृती मध्यम आकाराचे दाणे, १९.७० टक्के तेलाचे प्रमाण, खोडमाशी किडीस प्रतिकारक. २२ ते २५
जे.एस.-९५-६० ज.ने.कृ.वि.‍वि., जबलपूर २००७ ७५ ८२ ते ८८ झाडाची उंची ४० ते ५० सें. मी., मध्यम गडद रंगाची पाने, जांभळया रंगाची फुले, गडद तपकिरी शेंगा, ३ ते ४ दाणे प्रती शेंग (२० ते २५ टक्के ४ दाण्यांच्या शेंगा), करडा हायलम व पिवळसर गोलाकार जाड दाणा, १८ ते २१ टक्के तेलाचे प्रमाण. १८ ते २०
डी.एस.-२२८ म. फु. कृ. वि., राहुरी २००३ ७५ ९५ ते १०० मध्यम आकाराचे दाणे, १०० दाण्याचे वजन १४ ग्रॅम, तेलाचे प्रमाण १७ ते २५ टक्के. २३ ते २५
एम. ए. यु. एस. -७१ व. ना. म. कृ. वि. परभणी २००२ ७५ ९३ ते १०० झाडाची उंची ५० ते ६० सें.मी., खोडावर करडया रंगाची लव, चोपडी हिरवी पाने, जांभळया रंगाची फुले, २ ते ३ दाणे प्रती शेंग, काळपट हायलम व आयाताकृती पिवळी दाणे, कमी ओलाव्यास सहनशील, रोग व किडींना प्रतिकारक, जेएस-३३५ पेक्षा १५ टक्के अधिक उत्पन्न. न फुटणारे वाण. २० ते ३०
जे.एस.-३३५ ज.ने.कृ.वि.‍वि., जबलपूर १९९४ ७५ ९० ते ९५ झाडाची उंची ४६ सें.मी., खोडावर किंचीत लव, किंचीत लव असलेली हिरवी पाने,‍ जांभळी फुले, चोपडया शेंगा, शेंगा तडकण्यास सहनशील, काळया हायलमसह पिवळी गोलाकार दाणे, सर्वात लोकप्रिय वाण व आंतरपिकास योग्य.   २५ ते ३०
ए.एम.एस.-१००१  (पीडीकेव्ही यलो गोल्ड) डॉ. पं. दे. कृ. ‍वि., अकोला २०१८ ७५ ९५ ते १०० ३ दाणी शेंगाचे प्रमाण जास्त, प्रथिने व तेलाचे प्रमाण इतर वाणाच्या तुलनेत जास्त. १८ ते २२
जे.एस.-९३-०५ ज.ने.कृ.वि.‍वि., जबलपूर २००२ ७५ ९० ते ९५ हिरवी पाने, सरळ वाढणारे व न पडणारे वाण, जांभळया रंगाची फुले, शेंगा तडकण्यास सहनशील, ४ दाणे प्रती शेंग, पिवळसर दाणे. २० ते २५
जेएस-२०-११६ ज.ने.कृ.वि.‍वि., जबलपूर २०१९ ७५ ९७ ते १०१ फुलांचा रंग पांढरा, गोलाकार पाने,  २० ते २२
के डी एस-७५३ (फुले किमया) म. फु. कृ. वि., राहुरी २०२० ७५ ९० ते ९५ फुलांचा रंग जांभळा, मध्यम आकाराचा दाणा. २३ ते २५ 
एएमएस-एमबी-५-१८ (सुवर्ण सोया) डॉ. पं.दे.कृ.वि., अकोला २०१९ ७५ ९८ ते १२० कापणीच्या परिपक्वतेपासून १० दिवसांपर्यंत शेंग फुटण्यास प्रतिरोधक २३ ते २५
जे.एस.-२०-३४ ज.ने.कृ.वि.‍वि., जबलपूर २०१४ ७५ ८० ते ८७ बहुविध रोगास प्रतिकारक्षम, हलक्या ते मध्यम जमिनीसाठी उपयुक्त २२ त े२५


*

खान आसिफ अहमद (संगणक व्‍यवस्‍थापक, महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादित) यांनी डिझाइन आणि विकसित केल

*