स्क्रीन रीडर
 
    1 2  
         

हरभरा

हरभरा पिकातील एकात्मिक पिक व्‍यवस्‍थापन
पिकांचे / जातीचे नाव अधिसुचित संस्था प्रकाशित वर्ष बियाणे दर (किलो/हेक्टर) कालवधी (दिवस) वाणांचे गुणधर्म सरासरी उत्पन्न (क्विंटल/हेक्टर)
विजय  म. फु. कृ. वि., राहुरी १९९३ ६० १०५ ते ११० लवकर येणारे वाण, कोरडवाहु तसेच वेळेवर उशिरा बागायती लागवडीकरीता योग्य, मर रोगास प्रतिबंधक, फिक्कट करडया रंगाचे दाणेे १४ ते १५
विशाल म. फु. कृ. वि., राहुरी १९९५ ६० १०५ ते ११० मर रोगास प्रतिकारक्षम, आकर्षक पिवळे टपोरे दाणे, अधिक बाजारभाव, दाण्याचा रंग लाल. १४ ते १५
पीकेव्ही काबुली-२ डॉ. पं दे कृ वि., अकोला २००० ७५ १०० ते १०५ झाडाची उंची ५५ ते ६५ सें.मी, हिरवे खोड, लांबट पाने, निमपसरी वाढ, पांढरी फुले, जास्त मोठे घाटे, पांढ-या रंगाचे टपोरे दाणे, मर रोग प्रतिकारक. १८ ते २०
विराट म. फु.‍ कृ. वि., राहुरी २००१ ६० १०८ ते ११८ झाडाची उचीं ३४ ते ४४ सें.मी., पसरट फिक्कट पिवळी पाने, निमपसरी वाढ, पांढरी फुले, काबुली वाण, ८१.२० टक्के डाळ उतारा, मर रोग प्रतिकारक. १६ ते २०
पीडीकेव्ही कांचन डॉ. पं दे कृ वि., अकोला २०१८ ६० १०० ते ११० अधिक उत्पादन देणारा व लवकर परिपक्व होणारा वाण, मध्यम जाड दाणे.  २० ते २५
फुले विक्रांत म. फु.‍ कृ. वि. राहुरी २०१७ ६० १०० ते ११० मर रोगास प्रतिकारक्षम वाण.. २० ते २२
फुले ‍विक्रम म. फु.‍ कृ. वि. राहुरी २०१६ ६० ९६ ते ११२ झाडाची उचीं ५५ सें.मी., मध्यम आकाराची पाने, मध्यम  उंच वाढ, मध्यम आकाराची घाटे व तपकिरी दाणे, २ दाणे प्रती घाटा, यांत्रिक पध्दतीने काढणे सोइस्कर, मर रोग प्रतिकारक.    १६ ते २२
बी डी एन जी के-७९८ व. ना. म. कृ. वि., परभणी २०१३ ७५ ११० ते ११५ कोरडवाहु व बागायती लागवडीस योग्य, मर रोगास प्रतिकारक, टपोरे दाणे, दाण्यांचा रंग पांढरा.  १६ ते १८
राजविजय-२०२ आर. व्ही. एस. कृ. वि. वि., ग्वॉलियर २०१५ ६० १०५ ते ११० झाडाची उंची ४६ सें. मी., लव असलेली पाने, ‍निमपसरी वाढ, गडद गुलाबी फुले, मध्यम आकाराची घाटे, तपकिरी गोलाकार गुळगुळीत दाणे.  २० ते २२
कृपा (बोल्ड) म. फु.‍ कृ. वि. राहुरी २००९ ७५ १०५ ते ११० जास्त टपोरे घाटे असणारा काबुली वाण, दाणे सफेद पांढ-या रंगाचे,  १८ ते २०
दिग्वीजय म. फु. कृ. वि., राहुरी २००६ ६० १०५ ते ११० झाडाची उंची ३४ ते ४३ सें.मी., गर्द ‍हिरवी पाने, निमपसरी वाढ, गुलाबी फुले, मध्यम टपोरा पिवळसर तांबुस दाणा, २ दाणे प्रती घाटा, ६७.४० टक्के डाळ उतारा, अधिक उत्पादन क्षमता, मर रोग प्रतिकारक. १४ ते १५
जॅकी-९२१८ डॉ. पं दे कृ वि., अकोला २००५ ७५ १०५ ते ११० झाडाची उंची ४० सें.मी. जांभळट खोड, मोठी पाने,‍ निमपसरी वाढ, गडद गुलाबी रंगाची फुले, सरासरी १ ते २ दाणे प्रती घाटा, मर रोग प्रतिकारक.  १८ ते २०
पीडीकेव्ही कनक डॉ. पं दे कृ वि., अकोला २०२० ६० १०० ते ११०  मध्यम टपोरा दाण्याचा वाण, लवकर व एकाच वेळी परिपक्व होणारा वाण, मर रोगास सहनशील,‍  संरक्षीत ओलिताखाली लागवडीसाठी शिफारस   २२ ते २५


*

खान आसिफ अहमद (संगणक व्‍यवस्‍थापक, महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादित) यांनी डिझाइन आणि विकसित केल

*